Friday, 8 May 2020

का कळेना!! Why not know !! Marathi Story

0


प्रमोद मेघाचा लहान भाऊ… आईवडील कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर हे दोघंच एकमेकांचा आधार होते…. मेरीट वर अभ्यास करून आज प्रमोद मोठ्या पदावर कार्यरत आहे… कॉलेजमध्ये त्याला रेवती भेटली आणि तिथूनच ते एकमेकांच्या प्रेमात पडले…. मेघाला त्याने रेवतीवर असलेल्या प्रेमाबद्दल सांगितले होते…. मेघालाही रेवती पसंत होती…. पण हे असं अचानक register marriage??
तिघेही दरवाजासमोर येऊन थांबतात…. मेघा एक दीर्घ श्वास घेऊन… दारावरची बेल वाजवणार …. त्याआधीच आतून दार उघडते….. तिघेही आश्चर्य व्यक्त करतात…. रेवतीच्या घरी आधीच काही पाहुणे आलेले होते… घरातून रेवतीचे आईबाबा त्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी बाहेर पडत होते…. रेवतीला बघून तीची आई पाहुण्यांना तिची ओळख करून देऊ लागली…. आणि मग पाहुण्यांचा निरोप घेऊन सगळे आत आले…. तोपर्यंत मेघा आणि प्रमोद शांतच होते… पाहुणे निघून जाताच….
मेघा : (तशीच मागे वळून) आमच्या आईवडिलांनी फार चांगलेच संस्कार आमच्यावर केलेत म्हणून आम्ही इथे मागणी घालायला आलो आणि आमची family bonding इतकी चांगली आहे की रेवतीशी register marriage करताना माझ्या भावाने निदान एक फोन करून मला सांगितले…. तरी की, ” ताई…. मी रेवतीशी register marriage करतोय”… But unfortunately तुमच्यात ती bonding नाही….. तुमची बहिण पळून जाऊन लग्न करते इथेच तिचा तुमच्या वरचा विश्वास कळतो…. रेवती आज माझ्या भावाची बायको आहे पण तिने पळुन लग्न केलं म्हणून तिच्या घराची बदनामी नको आणि आईवडिलांपासून तिची ताटातूट नको म्हणून मी इथे आले होते….. हे आमच्या आईवडिलांचे संस्कारच आहेत ज्यांनी मला आधी रेवतीचा आणि तिच्या घरच्यांचा विचार करायला भाग पाडलं……. येतो आम्ही……

इथे रेवतीही रडत रडत रुममध्ये निघून जाते….. रेवतीचे आईबाबा स्वतःकडे हतबल होऊन बघत बसतात…. रेवतीची आई तिच्या रूममध्ये जाते….. रेवती बेडवर पालथी पडून उशीला कवटाळून ढसाढसा रडत असते… आई तिच्या डोक्यावर हळूवार कुरवाळते….. रेवती रागाने आईचा हात दूर लोटते….. आई तिला समजावण्याच्या प्रयत्नात परत तिला हाक मारत कुरवाळते…. तशी ती रागात उठून बसते…. आई शिखाच्या चुकीची शिक्षा मला का देण्यात येतेय…. चुकीच तर शिखा वागली होती…. मनमानी पण तिच करत होती….. अजूनही शिखामूळे बाकीच्यांना का गृहीत धरताय तुम्ही….. आई तिला आपल्या जवळ घेते….. रेवती परत आपल्या आईच्या कुशीत ढसाढसा रडायला लागते…..
आज मेघाला एका क्लायंटच्या आॅफीसमध्ये मीटिंगला जायचे असते…. अस तर त्या क्लायंटचे बरेचसे प्रोजेक्ट मेघाने पूर्ण केले होते पण यावेळेस त्याच्या नवीन घराच डिझाइन होत ज्यात त्याने स्वतःहून लक्ष घातले होते… After all त्याला ते घर त्याच्या होणार्‍या बायकोला गिफ्ट करायच होत…. हा क्लायंट म्हणजे विक्रमचा मित्र रोहन देशमुख…. मेघाला हे अजूनतरी माहित नसत …. आज पहिल्यांदाच दोघांची ओळख होणार असते…..
Actually रोहनला रेवतीशी काही घेणदेण नव्हत…. रेवती सोबत लग्न करून त्याला विक्रमकडून आपला business वाढवून घ्यायचा होता…. पण आता रोहनला business पेक्षा मेघामध्ये जास्त interest वाटत होता….. म्हणून लग्न तुटण्याच वाईट त्याला वाटत नव्हतं….. रोहन… स्मार्ट, हुशार आणि एक श्रीमंत मुलगा पण तो थोडा स्त्री लंपट होता… आज ही मुलगी तर उद्या दुसरी…. विक्रमची आणि त्याची भेट एका conference दरम्यान होते…. त्याच्या गोड बोलण्याच्या स्वभावामुळे तो चांगलाच परीचयाचा होऊन जातो…. विक्रम स्वतःहून रेवतीच्या लग्नाचा प्रस्ताव रोहनसमोर मांडतो….. रोहनचा मूळचा स्वभाव फार वेगळा असतो….
रात्रीच्या जेवणासाठी मेघा आणि प्रमोद रेवतीच्या घरी येतात…. प्रमोद आणि रेवतीच लग्न destination wedding अस ठरवत… रेवतीचे बाबा लग्न गोव्याला त्यांच्या आजोळी करण्याचा प्रस्ताव मांडतात… पंधरा दिवसांनी साखरपुडा आणि एक महिन्यानंतर लग्न असा मुहूर्त काढुन सगळा कार्यक्रम ठरवतात….. सगळे गप्पा मारत हसत खेळत जेवणाला सुरुवात करतात… पण विक्रम जेवणाला उपस्थित नसतो… मेघा त्याबद्दल बाबांना विचारते… इतक्यात विक्रम आणि रोहन येतात….. रात्री घरी पाहुणे येणार असल्याचे विक्रमला माहित असते पण तो विसरतो… आणि रोहनचा राग गेला आहे हे बघण्यासाठी त्याला रात्रीच्या जेवणाच आमंत्रण देत घरी घेऊन येतो….
साखरपुड्यासाठी एक हॉल ठरवण्यात आला होता… मेघा आणि प्रमोद गाडीतून खाली उतरतात…. विक्रम स्वागताला उभाच असतो…. त्याची नजर मेघावर पडताच तो तिच्यात हरवून जातो…. जांभूळ रंगाची पैठणी अगदी चापून चोपून नेसलेली… कानात सोन्याचे झुंमके…. गळ्यात सोन्याचा नाजुक हार…. हातात कंगण… आणि पफ काढून एका बाजूला मोकळे सोडलेले केस…. माथ्यावर नाजूक चंद्रकोर….लाल रंगात भिजलेले नाजुक ओठ…. यात भर म्हणजे तिच्या गालावर पडणारी खळी… आज तिच्या रुपाने विक्रम पूर्ता घायाळ झाला होता….. याआधी त्याने तिला अस कधी पाहिल नव्हत…. कारण तो लग्नाच्या संवादात कधी नव्हताच…. पण आज नव्याने त्याच्या मनाला पालवी फुटली…..
दुसऱ्या दिवशी सकाळी मेघा रोहनच्या नवीन घरी जाते…. आपल्या प्रोजेक्टची काम कुठपर्यंत आली आहेत हे पाहायला… तिने बनवलेले डिझाइन हे प्रॉपर वर्क होत की नाही याकडे ती जातीचे लक्ष देते…. काही वेळाने तिथे रोहन येतो…. रोहन तिला मागून येऊन मिठी मारतो… मेघा तडक मागे फिरून रोहनच्या कानशिलात लगावते….. रोहन स्तब्ध होऊन जातो.. .. आसपास बघतो तर तिथे त्या दोघांशिवाय कोणी नसत….. मेघा तिथुन निघून जात असते…..
सगळे दोन दिवसांनी गोव्याला येऊन पोहोचले…. संध्याकाळी मेघा आणि प्रमोद सुद्धा तिथे पोहचले…. संध्याकाळच्या मावळतीला तांबडा शुभ्र आकाश… न्हाऊन निघाला होता…. तांबूस चांदण्या प्रकाशात खळखळणारा समुद्राच्या लाटा मन प्रसन्न करत होत्या…. गार वाऱ्याची झुळूक अंग मोहरत होती…. आणि अशा निसर्ग रम्य ठिकाणी रेवतीच्या बाबांच आजोळ होत….. रेवती आणि प्रमोदच wedding destination……

पहाटेच्या वेळी मोकळ्या रस्त्यावर गाडीच्या वेगात गार वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करत होती… दोघेही शांतच… मेघा गाडीतला म्युझिक सिस्टिम चालू करते नकळत गियर बदलताना विक्रमच्या हाताला मेघाचा स्पर्श होतो दोघेही शाहारतात…. विक्रम sorry बोलुन समोरचा मिरर ठीक करतो… मेघाही मनात चलबिचल झाल्याने खिडकीतून बाहेर न्याहाळत बसते…. विक्रम अधून मधून तिलाच बघत असतो….
आज रेवती आणि प्रमोद ची मेहंदी आहे….. दिया जरी धांदरट वाटत असली तरी तिने तीची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली…. सकाळी मेहंदी होती रात्री असाच नाचगाण्याचा कार्यक्रम ठरला होता…. रेवतीच्या चेहर्‍यावर प्रमोदच्या प्रेमाने आधीच रंग भरला होता…. आता मेघाच्याही सजण्या सवरण्यात हलकासा बदल झाला होता…. आपल्याला कोणीतरी नोटीस करतं या विचाराने ती स्वतःकडे जास्त कटाक्ष टाकत होती…. आता तीची नजर विक्रमलाच आधी शोधत होती….
आबोली रंगाची घागरा चोली… त्यावर जाळीदार आणि नाजूक मोती असलेली ओढणी पांघरलेली …. त्यातुन तीची नाजूक कंबर लपाछपी करत नजरेस पडत होती…. त्याने लगेच नजर चोरली पण मन काही थांबत नव्हत….न राहवून त्याने परत तिला पाहिल…. त्याच कमरेवर ती सोनसाखळी अजून आकर्षक वाटत होती…. गोर्‍या हातावर काढलेली ती नक्षीदार मेहंदी…. पायात घुंगरूनी भरलेले पैजण…. कानात खड्यांचे झुंमके….. ओठांवर हलकीशी लिपस्टिक…. आणि तिच तीची गालावरची खळी….आज तो परत तिच्या सौंदर्यावर भूलला होता …. तिला येताना पाहतच बसला….
ती येतच होती की खाली पडलेल्या काचेच्या तुकड्यावर तिचा पाय पडला… .आई गं म्हणत ती ओरडली…. तसा विक्रम भानावर येत तिच्याकडे धावला पण आधीच तिथे रोहन पोहचला…. रोहनने लगेच तिच्या पायात रुतलेला काचेचा तुकडा काढला आणि आपल्या किशातला रूमाल तिच्या जखमेवर बांधला…. काय मेघा खाली बघून चालायच ना??? दिया घेऊन जा नीट हिला आता आराम कर थोडा ….. रोहन म्हणाला…..

विक्रम बाइक घेऊन थेट एअरपोर्टच्या दिशेने निघतो… अधून मधून तिला फोनवर contact करण्याचा प्रयत्न करत असतो…. पण तिचा फोन बंद येतो… या पंधरा मिनिटांत नक्की काय झालंय काहीच कळायला मार्ग नव्हता… एअरपोर्टवर पोहचण्यासाठी लागणारा तासाभराच अंतर विक्रमने अर्ध्या तासात पार केला होता…. इथे रोहन आणि दिया सुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न करत होते….
विक्रम एअरपोर्टवर सर्वत्र चौकशी करतो पण मेघाचा काहीच पत्ता लागत नाही…. सतत रोहन आणि दियाला सुद्धा संपर्कात ठेउन असतो…. विक्रमच्या मनात मेघाबद्दल भीती वाटायला लागते….. दुपारपासून मेघाला शोधता शोधता रात्रीचे नऊ वाजतात…. इथे घरी सगळे विक्रम कुठे गेला म्हणून विचार करतात तस रोहन काहीतरी काम सांगुन वेळ मारून नेतो…. दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडतच होता…. आज आत्ता अचानक पावसाने जोर धरला होता …..
एका चहाच्या टपरीवर येऊन विक्रम थांबला…. तिथे पण मेघाचा मोबाईल मधला फोटो दाखवत तिची चौकशी करू लागला…. पावसात तो पूर्णपणे भिजला होता… गार वाऱ्याची थंडी घालवण्यासाठी तो तिथेच थांबून चहा पीत बसला….. पावसाचा जोर वाढत होता…. म्हणून टपरीवालाही घरी जाण्याच्या घाईत होता…. सहज विक्रमला आठवले की त्याच्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील मित्राकडे Location tracking device आहे…. आहे म्हणजे त्या device च काम सुरू आहे… विक्रमने त्याची मदत घेण्याच ठरवल पण तो अशा ठिकाणी होता जिथे मोबाईलला रेंजच नव्हती…. तो परत घराच्या दिशेने मेन रोडवरून निघाला…..
थंडीने आता त्यालाही कापरी भरली होती पण तरीही मेघाला शोधण्याची वेगळीच ओढ लागली होती…. भर पावसात बाईक वेगाने चालवणं शक्य नव्हतं म्हणुन तो normal गतीने चालला होता…. आसपास नजर फिरवत होता की कुठेतरी मेघा दिसेल… असच जाता जाता रस्त्याच्या कडेला कोणीतरी पडलेल त्याला दिसल…. त्याने बाईक थांबवली आणि तिथे जायला लागला…. एकीकडे मेंदू पुढे जाण्यास नकार देत होत कारण येवढ्या पावसात अशा सामसूम ठिकाणी कोण का येईल…. कुणी लुटारू टोळी असली तर???? पण दुसरीकडे मन म्हणतं होत की न जाणो मेघाला अशी मदत लागली तर कोणीतरी करावी कदाचित आपली पुण्याई तिच्या कामी येईल…
विक्रम जवळ जाऊन बघतो तर ती एक स्त्री असते हे त्याच्या लक्षात येत… ती अक्षरशः चिखलात माखलेली होती…. ती पाठमोरी असल्याने तिचा चेहरा दिसत नसतो…. आणखी जवळ जाऊन तिला सरळ करताच तो चमकतो…. कारण ती मेघा असते….. एक क्षण त्याला खूप आनंद होतो पण तिची अवस्था बघता तो थोडा काळजीत पडतो…. तिला उचलून बाईकवर बसवतो पण तिची शुद्धच हरपल्यामुळे थोड कठिण होत…. तो स्वतःचा शर्ट काढतो त्याला दोरी सारख पीळ घालतो आधी तिला बाईकवर बसवून स्वतः पूढे बसतो आणि त्या शर्टने तिला आपल्या पाठीवर घट्ट बांधून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी पोहघण्याचा प्रयत्न करतो….
विक्रम त्याला तो उभा असलेल्या गावच्या ठिकाणाच नाव सांगतो…. अनायसे त्या गावी रोहनचा डॉक्टर मित्र राहत असतो…. तो विक्रमला तिथे जाण्याच सुचवतो…. आणि स्वतः त्या मित्राला विक्रम मेघाच्या येण्याची कल्पना देऊन ठेवतो….. मेघाची हालत बघता या पावसात दुसरा कोणताच पर्याय नसल्याने विक्रम रोहनच्या डॉक्टर मित्राकडे जातो…. डॉक्टर दारातच त्यांची वाट बघत असतो…. विक्रमला येताना बघून तोही धावत त्याच्याजवळ जातो आणि मेघाला सावरतो… दोघे मिळून मेघाला आत घेऊन येतात…. डॉक्टरच्या दोन मजली घराची care taker बाजूलाच राहत असते… तिच्या मदतीने मेघाचे ओले कपडे बदलून मेघाला आतल्या खोलीत बेडवर झोपवतात….
मेघा : काल कॅबमध्ये बसल्यावर काही अंतरानंतर ड्रायव्हरने अचानक गाडीचा वेग वाढवला…. मी त्याला गाडी थांबवायला सांगितली…. माझा विरोध बघून त्याने कसलासा स्प्रे माझ्या तोंडावर मारला…. त्यानंतर काय झालं मला आठवत नाही…. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी एका पडीक खंडरमध्ये होते….अंधार पडत आला होता… आसपास फक्त झाडी होती…. मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण रस्ता काहीच कळत नव्हता…. माझा फोन, माझ सामान काहिच जवळ नव्हत… एका ठिकाणी सात ते आठ जंगली श्वापद होती मला बघताच माझ्या अंगावर धावून आली…. मी माझा जीव वाचवण्यासाठी पळत सुटले… एका दगडावर ठेच लागून पडले… कदाचित त्यातच माझा पाय मुरगळला असावा…. पण जीव वाचवण्याच्या नादात त्यावेळी कळल नाही…. त्यातच पाऊससुद्धा सुरू झाला… मी नक्की कुठच्या दिशेने चालले आहे हे पण माहित नव्हतं…. मी पूर्णपणे घाबरले होते…. धावून धावून पूर्ण थकले होते…. भर पावसात माझा अवतार बघून मेन रोडवर कोणी गाडीही थांबवत नव्हत…. त्यातच मला कधी ग्लानी आली माहित नाही…. आता जाग आली तेव्हा तुम्ही समोर दिसलात आणि जिवात जीव आला….
थोड्यावेळाने मेघाही तिथे येते…. विक्रम खाण्यासाठी काय बणवता येइल किंवा आता काय available आहे ते बघत असतो…. मेघा किचनच्या दारातूनच बघत असते…. रोहनने सांगितल्याप्रमाणे डॉक्टर unmarried आहे म्हणजे घरात काही उपलब्ध असणं कठीण होत …. तो फ्रीज उघडून बघतो तर त्यात ब्रेडच पॅकेट आणि अंडे, जॅम, बटर हेच थोड्याफार प्रमाणात होत… ओट्यावर बास्केटमध्ये चार पाच मॅगीचे पॅकेट होते…. काल दुपारपासून उपाशी त्यामुळे भूक तर खूप लागली होती…. मस्तपैकी अंडाब्रेड खाण्याचा बेत केला आणि तयारीला लागला…. मेघा लांबूनच हसत होती…. तिच्या हसण्याचा आवाज ऐकून तो तिला आधी ओरडू लागला….
दोघेही हसत खेळत नाश्ता संपवतात…. विक्रम सगळ आवरून ठेवतो…. मेघा बाहेरचा अंदाजा घेण्यासाठी बाल्कनीत जाते…. पावसाची सर तिच्या अंगावर येते…. गार वाऱ्याची झुळूक मनाला भुरळ घालून जाते… आपले दोन्ही हात पसरवून ती त्या पावसाचा आनंद घेत असते… तिला भिजताना बघुन विक्रम तिला आत ओढतो… अडखळल्यामुळे तोल जाऊन ती विक्रमवर पडते, विक्रम बाजूच्या सोफ्याचा आधार घेत तिला सावरतो…
त्याचा स्पर्श, त्याचा सुगंध तिला भुरळ पाडतो… दोघाची नजरभेट होते…. या नजरभेटीत दोघेही हरवून जातात… Land-line वर फोन वाजल्यामूळे दोघे भानावर येतात… विक्रम मेघाला सावरून सोफ्यावर बसवत फोन उचलतो… रोहनचा फोन असतो…. रोहनला हालहवाल सांगून विक्रम फोन ठेवून देतो… अशीच गप्पांमध्ये संध्याकाळ कधी होते कळतच नाही…. मेघा कॉफी घेऊन येते…. विक्रम मोबाईल Bluetooth ला कनेक्ट करुन गाणी लावतो…. बाहेर पडणारा पाऊस.. गार वारा.. आणि रेडिओवरील रोमँटिक गाणे… आहाहा काय योग जुळून आला होता…. रेडीओवाले पण अशा पावसात खूप छान गाणी लावतात…

सावन बरसे तरसे दिल क्‌यूं ना निकले घर से दिल
बरखा में भी दिल प्यासा है ये प्यार नहीं तो क्‌या है
देखो कैसा बेकरार है भरे बाज़ार में
यार एक यार के इंतज़ार में
सावन बरसे तरसे …

रिमझिम रिमझिम, रुमझुम रुमझुम
भीगी भीगी रुत में, तुम हम, हम तुम
चलते हैं, चलते हैं
एका मागून एक गाणं वाजत होत आणि अचानक एक नवीन गाण सुरू झाले… मेघा गाण्याचा आवाज वाढवण्यासाठी उठते.. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने तिच्या गालावरची केसाची बट उडत असते… अशा वातावरणात अशी सुंदर गाणी ऐकल्यावर कोणाचाही मूड बदलेल… तसच काहीस दोघांचही झाल होत… एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेम भावना उफाळून येत होत्या…. आणि अशात गाणं कानावर पडत

बरखा से बचा लूँ, तुझे सीने से लगा लूँ, आ छुपा लूँ
दिलने पुकारा देखो, रुत का इशारा देखो
उफ़ ये नजारा देखो, कैसा लगता है
ऐसा लगता है, कुछ हो जायेगा
मस्त पवन के ये झोंके सैय्य़ा देख रहे हो
मेघाला आपल्या दिशेने वळवतो…. मेघा हळूच त्याच्या मिठीत शिरते…. तोही तिला अलगद आपल्या मिठीत सामावून घेतो… त्या गाण्याच्या तालात असेच हरवून जातात…. त्याच्या ह्रृदयाची धडधड वाढायला लागते जी तिला स्पष्ट ऐकू येऊ लागते… त्याच्या स्पर्शाने तिच्याही अंगावर शहारे आले होते… पण जगातली सर्वात सुरक्षित जागा हीच आहे याची खात्री तिला होती… प्रेम कितीही उफाळून आल असल तरी प्रणयाची सीमारेषा त्यांनी ओलांडली नव्हती…. दोघेही असेच नंतर सोफ्यावर बसून होते… ती त्याच्या मिठीत त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत कधीच झोपी गेली होती…..
सकाळपर्यंत पाऊस बऱ्यापैकी कमी झाला होता… रस्त्यावरच पाणीही कमी झाल होत… आता घरी निघायला हरकत नाही या विचाराने डॉक्टरचा निरोप घेऊन दोघे बाईकने निघतात… मेघा अजूनही गालातल्या गालात लाजत असते…. आज घरी जाऊन आईबाबांना सांगून मेघाला आपल्या पास्ट बद्दल सगळं खर सांगून प्रपोज करायच विक्रमने ठरवल होत…. मेघाही खूप खुश होती…. तिनेही आपल्या भावना विक्रमला सांगण्याच ठरवल होत….
गाडी एकदाची विक्रमच्या आजोळी येऊन थांबते…. सकाळीच रोहन आणि दियाने मागच्या दोन दिवसाचा सारांश घरी आईबाबांना आणि रेवती, प्रमोदला सांगितला होता…. सगळे वाटच बघत होते… मेघा आणि विक्रम घरात येतच होते…. इतक्यात समोरून शिखा येते… आल्या आल्या विक्रमला मिठीमारून ओठांवर हलकेच किस करते….. तिच्या येण्याने विक्रमला धक्काच बसतो… तो स्तब्ध होऊन जातो…
सगळे जेवायला बसतात…. आणि त्यांच्या गप्पा टप्पा सुरू होतात… मेघाच्या अगदी समोरच्या खुर्चीवर शिखा बसते… विक्रमही येतो… त्याच्यासाठी शिखाच्या जवळची खुर्ची रिकामी असते तो नाइलाजाने तिथे बसतो… शिखा सारखी विक्रमच्या मागे… हे वाढू का? ते वाढू का?? असच सुरू होत…. विक्रममात्र तिला avoid करत होता…. मेघाच जेवणात अजिबात लक्ष नव्हत…. विक्रमचीही काहीशी तीच परिस्थिती होती… बाबांनी हे बरोबर हेरल पण आता शांतच रहाण पसंत केल….
रेवती : मी सांगते…. Actually… शिखा आणि भाई एकाच कॉलेजमध्ये होते…. भाई last year आणि शिखा first year ला असताना त्यांची ओळख झाली… तिथेच भाईने तिला प्रपोज केलं आणि शिखाच कॉलेज संपल्यावर दोघांनी लग्न केलं…. बाकी त्यांची लव स्टोरी डिटेलमध्ये सांगण्यात मला अजिबात interest नाही… कारण ते खरच प्रेम होतं अस मला नाही वाटत… शिखा आपल्या आजी आजोबांकडे वाढली… Her parents was separated… तरी लग्न सगळयांच्या सहमतीने झाले होते…. सगळकाही हिच्या मनासारखच केल होत…. Catholic wedding, Europe tour, येवढच काय तर लग्नानंतर वेगळ घर आणि वेगळा संसार सुद्धा… दिवसभर फक्त शॉपिंग, फिरण आणि पार्टी, रात्री उशिरा घरी यायच… हेच lifestyle….. नवीनच लग्न झाले आहे जबाबदारी सांभाळायला थोडा वेळ लागेल… म्हणून भाई सगळं ignore करत होता….
शिखाच्या मनात वेगळच चालू होत…. आजी आजोबांकडे थोडे दिवस रहायला जाते सांगून हि मैत्रिणीकडे रहायला गेली…आजी आजोबा घरी आले होते शिखाच अभिनंदन करायला तेव्हा कळाल की ती खोट बोलून दुसरीकडेच कुठे गेली पण कुठे गेली आणि खोट बोलायची काय गरज होती हे ती आल्यावर सविस्तर कळल…. मैत्रीण आणि तिच्या boyfriend ची मदत घेतली, म्हणजे मैत्रिणीच्या boyfriend ला नवरा म्हणून खोटी सही करायला लावली आणि abortion करुन आली….
रात्री सगळं आवरून सगळे आपाआपल्या खोलीत निघून जातात…. इथे शिखा विक्रमला मनवण्याठी पूर्ण तयारी करत असते… थोड्यावेळाने विक्रम खोलीत येतो…. दार उघडून बघतो तर संपूर्ण खोलीत मंद असा सुगंध दरवळत होता…. चहूबाजूंनी रंगबेरंगी candles प्रकाशत होत्या…. बेडवर छान गुलाबाच्या पाकळ्या सजवल्या होत्या…. आणि समोर शिखा होती…. गडद लाल रंगाचा शॉर्ट टू पीस गाऊन… केसांचा बांधलेला मेसी बन…. त्यातून चेहर्‍यावर दोन्ही बाजूंनी गालावर ओघळणारी केसांची शीर हलकेच उडत होती…. गडद रंगाची लिपस्टिक तिच सौदर्य खुलवत होती…. एकेकाळी याच सौंदर्याच्या प्रेमात पडला होता विक्रम…..
शिखाने विक्रम आत येताच मागून दाराला कडी लावली…. आपल्या मादक चालीत त्याच्या जवळ गेली… पटकन त्याच्या मिठीत शिरून बिलगली…. तो अजूनही स्तब्ध होता… त्याच्या शर्टाची कॉलर बाजूला करुन त्याचा मानेवर किस करायला जाणार तोच विक्रम तिला दूर करतो…. आणि बाहेर जाण्यासाठी दार उघडायला लागतो पण शिखा त्याला मागून घट्ट मिठी मारते…. तिच्या लाडिक सुरात त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते….. पण विक्रम तिचे दोन्ही हात झटकून बाहेर निघून जातो…..
एअरपोर्टवर पोहचल्यावर प्रमोद आणि रेवतीला निरोप घेऊन बाकीचे कॉफी शॉपमध्ये बसले कारण बाहेर नुकताच पाऊस सुरू झाला होता…. दिया, रोहन आणि मेघा एका टेबलवर बसले… विक्रम शिखाला घेऊन मुद्दाम दुसऱ्या टेबलवर बसतो… कारण मेघाच्या रात्रीच्या उत्तराने त्याचा इगो थोडा दुखावला होता… शिखा सोबत बघून किंवा त्याने तिला avoid केल तर ती चिडेल त्याच्याशी भांडेल अस विक्रमला वाटत होतं….
येवढ बोलुन विक्रम मेघाला अजून जवळ ओढतो… आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवतो…. मेघा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते पण तो असफल ठरतो… आज त्या ओढीत परत एकदा दोघेही हरवून गेले… आता तिच्याही नकळत त्यांची मिठी घट्ट होत चालली होती… संपूर्ण वेळ त्यांच्यासाठी इथेच थांबली होती… काही वेळाने भानावर येऊन दोघेही वेगळे होतात…. इतक्यात…..
आईच्या हाकेला ऐकून सगळे जमा होतात… समोर शिखा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडली होती आई तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत होत्या…. रोहन गाडी काढ.. (विक्रम म्हणाला )….तिला अस पाहून सगळेच घाबरतात…. विक्रम तिला उचलून गाडीत नेतो…. गाडी थेट हॉस्पिटलला रवाना होते…. मागोमाग दिया आणि मेघा सुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल होतात…..
डॉक्टरांची तातडीने हालचाल सुरू होते… रोहनचा डॉक्टर मित्र तिथेच असल्याने उपचारात जोर धरला जातो…. विक्रम आणि बाकीचे सगळे डॉक्टरांना विचारणा करतात…. शिखा कसल्याशा जीवघेण्या आजाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास येते.. आणि तिला ताबडतोब मुंबईला शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात… विक्रमच्या तर पायाखालची जमीनच सरकते… शिखाला मानसिक आधाराची गरज असल्याचे डॉक्टर सांगतात…. विक्रम सगळी परिस्थिती घरी सांगतो आणि सगळे मुंबईला रवाना होतात….
विक्रम शिखाच्या आई वडिलांना बोलावून घेतो… ते वेगळे झाले असले तरी मुलीसाठी पहिल्यांदा एकत्र आले होते….शिखा अजूनही विक्रमची बायको होती… तिने जरी पूर्वी तिची कर्तव्ये नाकारली असली तरी शिखाच्या आजी आजोबांना दिलेल वचन विक्रम कसा विसरणार होता…”आमच्या नातीला आईवडीलांचा सहवास नाही लाभला…तुम्ही प्रेमाने लग्न केले आहे… शिखा थोडी अल्लड आहे पण तु समजदार आहेस… तु तिला अतंर देऊ नकोस वचन दे आम्हाला….” आज ते या जगात नाही… असते तर त्यांना माझ्या मनाची घालमेल नक्कीच कळली असती….
इथे मेघाने सर्व आठवणी मनातच दडवून आपल्या पूर्वायुष्याला सुरुवात केली होती…. विक्रमच्या आठवणीचा त्रास होऊ नये म्हणून स्वतःला कामात व्यस्त करुन घेतले होते… यातच मेघाला मोठा contract मिळाला US च्या कंपनीचा… त्यामुळे ती सहा महिन्यांसाठी US ला स्थाईक झाली होती….. रेवती आणि प्रमोद यांचा संसाराचा गाडा सुरळीत सुरू होता…..
मेघा घरी आल्यावर पाहते तर अगदी पार्टी वातावरणात घर सजवल होत… रोहन आणि दिया आधीच हजर असतात… दोघांना भेटून तिला फार बरं वाटतं…. मेघा फ्रेश होण्यासाठी रुम मध्ये जाते… बाहेर आल्यावर पाहते तर आई, बाबा आणि विक्रम बसलेले असतात…. बाजुला रोहन आणि दिया सुद्धा उभे असतात… विक्रमला बघताच जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या… नकळत डोळे भरून आले… पण कोणालाही तस जाणवू न देता ती आई बाबांना वाकून नमस्कार करते ….
आई : मेघा आज तुमच्या दोघांसाठी आम्ही हा सरप्राइज प्लान केला…. शिखा आता या जगात नाही… दोन महिने झाले…. पण जाण्याआधी तिने तुम्हा दोघांविषयी मला सांगितले….. येवढच नाही तर तिने तुझीही माफी मागितली… ती ज्या आजाराने ग्रस्त होती त्याविषयी तिला आधीपासूनच माहित होते… पण जाण्यापूर्वी तिच्याबद्दल कोणाच्याही मनात सल राहू नये म्हणून तिने सर्वांची मने जिंकण्यासाठी नव्याने सुरुवात केली…. आणि आपले शेवटचे क्षण आनंदाने घालवण्यासाठी ती इथे आली होती… तिला माहीत होतं की विक्रमच तिच्यावर खूप प्रेम होत आणि त्यामुळे तो तिला नक्की माफ करेल…. तुम्हा दोघांना एकत्र बघून तिला त्याच वेळी खात्री पटली होती आणि म्हणून काही दिवस सोबत राहून ती परत जाणार होती पण त्याआधीच तिच्या आजाराबद्दल आपल्याला कळल…. तिने विक्रमची देखील माफी मागितली की शेवटच्या क्षणीही स्वार्थ साधला म्हणून… हे सगळं तिने मला त्या वेळेस सांगितलं जेव्हा ती ventilator वर शेवटचे श्वास घेत होती….
हिरवीगार पेशवाई सिल्क साडी नेसून, केसात आबोली आणि मोगऱ्याचा गजरा माळला होता तिने … समोरच्या खुर्चीत खाली मान घालून बसली होती मेघा … विक्रम तिच्या जवळ जातो.. आपल्या गुडघ्यावर बसतो…. उजव्या हाताच्या दोन बोटांनी तीची हनुवटी अलगद वर उचलतो…पापण्या अजूनही झुकलेल्या, त्या पापण्यांवर गुलाबी रंगाचा आय शॅडो, काळ्या रंगाचा आयलायनर, ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक, नाकात नाजूक नथ, माथ्यावर छोटीशी बिंदी… आणि त्या बिंदीचा डूल बरोबर कपाळावर लावलेल्या चंद्रकोरीच्या मध्यावर होता… तिला पाहून विक्रम पूर्ता घायाळ झाला….

0 comments:

Post a Comment