Thursday, 16 April 2020

प्रेम - एक गुंतवणूक Love - an investment Marathi Love Story

0





मी कर्तव्य साळगावकर. माझा जन्म एका खेडेगावात झाला. माझे सहावीपासून शिक्षण बाहेरगावी झाले, घरापासून दूर. नववीपर्यंत माझे शिक्षण रडण्यातच गेले. कारण मला माझ्या घरापासून दूर राहावे लागतं होते. बाबांनी अट मांडली कि जर तुला दहावीत चांगले टक्के गुण मिळालेत तर मी पुण्यात घर घेईल आणि तुला आमच्यासोबत राहता येईल. आणि पुढील शिक्षण आमच्यासोबत राहून करता येईल.

मी या आनंदाने खुप अभ्यास केला आणि त्यात यशही मिळवले. दहावीच्या चांगल्या टक्क्यांवरून माझ्या बाबांनी पुण्यामध्ये घर घेतले. माझे घरी राहून पुढील शिक्षण होईल याचा आनंद. परंतु माझा प्रवेश अश्या महाविद्यालया मध्ये झाला की तुम्हाला इथेच वसतिगृहात रहावे लागेल. मी नाही म्हटले असता मला तिथे प्रवेश घेणे भाग होते. कारण बाबांचा निर्णय हा शेवटचा असायचा. मग मला परत घरापासून दूर राहावे लागले. कारण


मी अकरावीत त्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. माझी अकरावी तर पूर्ण रडण्यातच गेली. मग मित्र - मैत्रिणी भेटल्यामुळे मन रमायला लागले. थोडेफार अभ्यासाकडे लक्ष देता आले. कारण आमच्या गटातील प्रत्येक व्यक्ती हुशार होती. आमच्या एकमेकांच्या नोट्स एकमेकांकडे जायच्या. आम्ही त्यातूनच अभ्यास करायचो. रोज कॅन्टीन ला सोबतच बसायचो. त्यात माझी शेरो शायरी चालायची. आणि दिवस असेच निघत गेले.

आता मी बारावीत गेलो होतो. एके दिवशी मला माझ्या नोट्स मध्ये एक कागद सापडला. त्या कागदावर एक दिल काढला होता. त्या दिल मध्ये फक्त ‘K’ काढला होता. आणि दुसरी जागा रिकामी सोडली होती. मी विचार केला आणि कुणालने मला समजावून सांगितले कि हा ‘ K’ कर्तव्य चा आहे, आणि समोरच्या व्यक्तीला जाणून घ्यायचे आहे कि कर्तव्य चे कुणावर प्रेम आहे? आणि आमच्या नोट्स सगळीकडे फिरत असल्यामुळे कुणी लिहिले असावे याचा अंदाज करणे कठीण होते. मी तो कागद परत तसाच त्या नोट्स मध्ये ठेऊन दिला. मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत त्यावर विचार करणे सोडून दिले. परंतु त्या व्यक्तीने याकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते.

एके दिवशी मला परत त्याच नोट्स मध्ये तोच कागद मिळाला. आणि त्यात असे म्हटले होते कि “ कर्तव्य मला नाही माहिती तुला कोण आवडते, परंतु तू मला फार आवडतोस. तुझे उत्तर काहीही असो पण मला या नंबर वर फोन करून नक्की कळव. तुझीच अवनी.” म्हणजेच मला अवनीने स्वतः संगितले कि तिला माझ्यावर प्रेम आहे. आमच्या मैत्रीतील जवळीकता वाढली असल्यामुळे आणि तिही तितकी सुंदर असल्यामुळे मलाही तिच्यावर प्रेम होणे साहजिकच होते. मी कुणालचा सल्ला घेऊन प्रेमाचा स्वीकार केला. असाच आमच्या प्रेमाचा काळ उलटत होता आणि शिक्षणाचाही.

आज मला पासपोर्ट काढण्याकरिता रेल्वेने दुसऱ्या गावाला जायचे होते. थोडा उशीर झाला म्हणून तिकिट काढणे शक्य झाले नाही. गाडी प्लॅटफॉर्म वरून निघाली. गाडीचा वेग वाढत होता. परंतु माझे आजच जाने गरजेचे असल्यामुळे मी कसातरी चढण्याचा प्रयत्न करत होतो. आणि एकदम दरवाज्यातून माझा पाय घसरला. मी पडणारच तेवढ्यात एका व्यक्तीने माझा हात पकडला. आणि मला आत ओढले. मला त्या व्यक्तीने जीवनदान दिले होते. मी फार घाबरलो होतो. मला त्या व्यक्तीने शांत केले. मला पाणी दिले. मी त्या व्यक्तीचे आभार मानले. रेल्वेमध्ये खूप भीती वाटत होती कारण माझ्याकडे तिकिटही नव्हते. मला ज्या गावाला जायचे होते तिथे मी पोहोचलो. परंतु रेल्वेस्टेशन वर मला तिकिट तपासणार्यांनी पकडले. मला फार भीती वाटत होती तेवढ्यात परत त्याच व्यक्तीने मला त्यांच्या मागून इशारा केला आणि तिकिट खाली टाकले. आणि ती व्यक्ती निघून गेली. मी थोडाही विचार न करता ते तिकिट उचलले. तिथून कसातरी सुटलो. बाहेर जाऊन आम्ही सोबत चहा घेतला. मी त्या व्यक्तीचे आभार मानले. आज ती व्यक्ती माझ्रासाठी देव म्हणूनचं आली होती. ती व्यक्ती म्हणजे माझा नवीन मित्र ‘आरीफ भाई’. आम्ही एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि मी त्याच दिवशी त्या व्यक्तीकडून एक वचन घेतले ते म्हणजे की “जेव्हा तुम्हाला माझी गरज पडेल तेव्हा तुम्हाला मी नक्की आठवेल”. त्या व्यक्तीने मला वचन दिले आणि आम्ही तिथून निघून गेलो. आज ३ मे. आज माझा वाढदिवस. सर्व मित्र-मैत्रिणींनी माझा वाढदिवस साजरा केला. कुणाल, अवनी, कल्पना, राधा असे सर्वांकडून गिफ्ट्स मिळाले. नंतर काही महिने उलटून गेले.
एके दिवशी क्लास मध्ये एका मुलीचा मोबाईल वाजला. आणि तिला आमच्या महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. तेव्हा मला पहिल्यांदा माहिती झाले कि आपल्या महाविद्यालयात मुलींकडे मोबाईल चालणार नाही. मी फार विचारात पडलो. कारण मी अवनी सोबत फोन वरच बोलायचो. मी जेव्हा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता फोन केला होता तेव्हा ती नक्की घरीच बोलत होती ना? असे अनेक प्रश्न मला त्रास देत होते. मी त्याच संध्याकाळी तिला सर्वकाही खरे सांगायला सांगितले. मग त्यावर माझे तिला खूप प्रश्न. आणि त्याच संध्याकाळी अवनीबद्दल मला खूप काही माहिती झाले. तो फोन तिला तिच्या मित्राने दिला होता. ज्या वक्तीवर ती माझ्या आधीपासून प्रेम करायची. तिचा फोन नेहमी व्यस्त असायचा, तर मग ती त्याच्याशीच बोलायची का? असे प्रश्न मला त्रास देत होते. मी खूप अस्वस्थ झालो होतो. माझे रडणे थांबणे कठीण होते. कुणाल मला समजावून सांगत होता. परीक्षेची वेळ होती आणि माझ्रासोबत हे सर्व घडत होते. मी कुणाचेही काहीच न ऐकता सर्व काही सोडून आत्महत्येचा निर्णय घेतला. पण काय करणार मला जीवनदान दिलेल्या आरीफ भाई ची मदत अजून बाकी होती. परंतु मी जेव्हा त्यांना ती गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी मला भेटायला बोलावले. भेटीत बऱ्याच गोष्टी समजावून सांगीतल्या. परंतु मी ऐकायला तयार नव्हतोच म्हणून ते माझ्यासमोर अट मांडतात की तुला माझी मदत करायचीच असेल तर तुला तीन वर्षे थांबावे लागेल. आज तर मी खूपच विचारात गेलो. कारण मला जीवनदान दिलेल्या व्यक्तीची मदत करणे फार गरजेचे होते. मी माझा आत्महत्येचा निर्णय बदलण्याचा निर्णय घेतला. मी कशी तरी ती गोष्ट मान्य केली. आणि त्यांच्या मदतीसाठी जगण्याचा निर्णय घेतला.

मी बारावीत असतांना राधाच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला. आणि त्यात त्यांना त्यांचे घर घालवावे लागले. परंतु बाबांना त्याबद्दल पूर्ण माहिती असल्यामुळे मी हे सर्व बाबांना सांगितले. आणि राधा आमची चांगली मैत्रीण असल्यामुळे बाबांनी त्यांची मदत करून त्यांना पुण्यात घर मिळवून दिले. त्या सर्वांनी माझ्या बाबांचे खूप आभार मानले.

बारावीनंतर मी CA चा कोस केला. दोन वर्षे निघून गेलीत. एक वर्ष बाकी असताना मी उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आलो. जुन्या मित्र मैत्रिनीं सोबत भेटी झाल्या. माझे आणि माझा भाऊ वीरूचे खेळणे नेहमी सुरूच असायचे. असेच एके दिवशी मी आणि वीरू ऊन्हातून बाहेरून खेळून घरी आलो. घरात पाहुणे असल्यामुळे आम्ही बाहेरच बसलो. क्रिकेटच्या गोष्टी करत बसलो. आम्ही दोघे खेळून परत आलो आईला कळल्या बरोबर आईने विचारले कि तुम्हाला शरबत बाहेरच आणू काय? आणि आम्ही हो म्हणालो. गप्पागोष्टी करत बाजीवर झोपलो. लगेच शरबत आले. आणि घेऊन आलेली व्यक्ती पाहुन आम्ही दोघेही झटक्याने उठून बसलो. सुंदर पंजाबी ड्रेस घातलेली, केसांची छान वेणी घातलेली, डोळे काळेशार, सुंदर तिची नजर आणि ती वक्ती म्हणजे ‘आसमा’. मी पाहतच बसलो. मला वीरूने धक्का देऊन शरबत घ्यायला लावले. सर्व कुटुंबासोबत ओळख होऊन गेली आणि ते त्यांच्या गावी निघून गेले. मी मात्र त्या व्यक्तीच्या बाबतीत विचार करतच राहिलो. परंतु आता माझेमन मला त्या गोष्टीसाठी परवानगी देत नव्हते.

आज १७ डिसेंबर, आज ताईचे लग्न. मी ताईच्या लग्नात मंगलाष्टक म्हटले. आरीफ भाई सोडून माझे सर्वच मित्र लग्नात आले होते. लग्न झाले. मी दीदी सोबत खूप रडलो. त्या दिवशी मला लग्नात परत आसमा दिसली. तीने माझे मंगलाष्टक साठी कौतुक केले. आम्ही दोघे पहिल्यांदा बोललो. सर्व काही पार पडल्यावर माझे मन परत एकदा आसमाच्या विचारात भरकटत होते. ते आपल्या सोबत सहजच बोलली असावी कि आणखी काही असेल या विचारात मी पडलो.
काही महिने उलटून जातात आणि मला एका अनोळखी नंबरवरून मिस कॉल येतो. मी कॉल करतो आणि त्याच गोष्टी ज्या माझ्या मनाला नको होत्या.त्या नकळत घडायला सुरुवात झाली. प्रेमात रुपांतर झाले. तेव्हा सर्वात आधी ही गोष्ट मी कुणालला सांगितली आणि नंतर आरीफ भाईला. दोघांचे एकच उत्तर, बघ तुला सांगुन थकलो होतो मुलगी एका आगगाडी सारखी असते, एक गेली कि दुसरी आहेच.
शेवटचे वर्ष प्रेमात खूप चांगले गेले. माझा निकालही खूप चांगला आला. माझा स्विझर्लंड करीता नंबर लागला. मी खूप खूश होतो. स्विझर्लंड ला जान्या आधी मला सहा महिन्यांची सुट्टी असते. या सहा महिन्यात मला माझ्या घरी राहायचेअसते, घराच्या व्यक्तीसोबत. परंतु माझे आयुष्य इतके सरळ असणे शक्यच नव्हते. म्हणून एक सर्वात मोठी गोष्ट माझ्रा आयुष्यात घडणार होती ती आता.
आसमाचा मला एका संध्याकाळी कॉल आला. घरी असल्यामुळे मी बोलू शकलो नाही. पण तिचा मेसेज आला. आणि त्यात लिहिले होते कि मला फार महत्वाचे बोलायचे आहे. त्यामुळे मी घरून सुट्टी घेऊन बाहेर पडलो. आणि तिला बाहेरून फोन केला. काही बोलन्याआधीच ती रडायला लागली. ती मला फार घुमून फिरवून सांगत होती. पण मी तिला स्पष्ट शब्दात सांगण्याकरिता म्हंटले. तर ती म्हणाली कर्तव्य मी तुला फसवत नाही आहे. पण काय करू माझे एका व्यक्ती वर प्रेम आहे आणि त्या व्यक्तीने माझ्यासाठी भरपूर काही केले आहे. मी त्याच्याशी लग्न करणार आहे. कारण तुझे प्रेम इतके चांगले असल्यामुळे तुझ्या आयुष्यात कुणीतरी नक्की येणार आणि तुला जगायला लावणार . पण ती व्यक्ती माझ्राशिवाय जगणे कठीण आहे. कर्तव्य असे समजू नकोस कि माझे तुझ्रावर प्रेम नाही. प्रेम तर मला तुझ्रावरही आहे परंतु काय करणार मला लग्न मात्र त्या व्यक्तीसोबत करावे लागणार. मला माफ करशील. तुझे प्रेम फार छान आहे. तुझ्या आयुष्यात येणारी व्यक्ती फार नशीबवान असणार. आणि ती तुझ्रावर फक्त माझ्रापेक्षा नाही तर तुझ्रापेक्षाही जास्त प्रेम करणारी असणार . कर्तव्य मला माफ करशील. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. एवढे बोलून ती फोन ठेऊन देते. आता मला काहीच सुचत नव्हते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. दोन दिवस उलटून गेली. माझे कशातच मन लागतं नव्हते. मी शेवटी आरीफ भाईला फोन केला. कारण आज मी त्यांना ते वचन देऊन बरोबर तीन वर्ष झाली होती. आज मला त्यांची मदत करायची होती आणि हे जग सोडायचे होते. आता मलाच मी नको होतो. मी एकदा त्यांना भेटायला गेलो परंतु त्यांनी मला समजून सांगण्यासाठी आज पाऊल उचलले नाही. त्यांनी मला सांगितले की माझी मदत कर आणि नंतर तुला जर जग सोडायचेच असेल तर तू सोडू शकतोस. मी त्या तारखेची वाट पाहिली, तो पर्यंत माझ्या सर्व मित्र मॆत्रिणीना भेटून घेतले. कारण मला आता हे जग सोडायचे होते.
त्याच दिवसात अवनी ही माझ्याकडे परत आली होती. आणि अवनीची भेट राधा घालून देते कारण राधा घराजवळच राहत असते. परंतु मला आता काहीच नको होते. माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना माझी परिस्थिती माहिती होती. सर्वजण मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु माझे मन ऐकत नव्हते. मला आरीफ भाईची मदत करून इथून निघून जायचे होते.
जेव्हा मी त्यांना शेवटचे भेटायला गेलो होतो तेव्हा मला त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य सांगितले होते. त्यांनी त्यांची परिस्थिती सांगितली. घरचे फार गरीब होते. चार वर्षा पासून एकाच मुलीवर प्रेम होते. जेकाही केले ते फक्त त्या मुलीसाठी केले. आणि ताईच्या लग्नात न येण्याचे कारण त्यांनी मला त्या दिवशी सांगितले. ज्या दिवशी ताईचे लग्न होते त्याच दिवशी मला माझ्रा प्रेयसीच्या भावाने मारले होते. कारण त्याच्या दोन दिवस आधीच त्याला आमच्या बद्दल माहिती झाले होते. म्हणून मला ताईच्या लग्नाला येता आले नाही असे आरीफ भाईने मला सांगितले. हो आरीफ भाई चे सुद्धा प्रेम होते. ते त्या व्यक्तीसोबत लग्न करणार होते. आणि त्यांनी मला जी मदत मागितली होती ती हीच होती, कोर्ट मध्ये जाऊन मला त्यांच्या लग्नासाठी सही करायची होती. त्यांची ही लव्ह स्टोरी ऐकून मला असेवाटत होते कि माझ्यावर इतके प्रेम करणारी वक्ती मला का भेटली नाही.

मला या प्रकारचे बरेच प्रश्न त्रास देत होते. म्हणून मी आरीफ भाईला एक गोष्ट सांगून ठेवली होती ती म्हणजेतुमची मदत केल्याबरोबर मी हे जग सोडून जाणार.काही दिवस उलटून गेलीत. आरीफ भाई नी मला जो दिवस सांगितला होता तो जवळ आला. आज आरीफ भाईच्रा लग्नाचा दिवस. मी आज आई-बाबांना शेवटचेभेटून आरीफ भाईची मदत करारला आणि हे जग सोडायला निघून गेलो. मी त्यांच्या लग्ना करीता सही केली आणि तिथून जायला निघालो. परंतु कोर्टाबाहेर पडल्राबरोबर माझ्रावर काही बंडखोर मुलांनी हल्ला केला आणि मी बेशुद्ध झालो. ती मुले तिथून निघून गेली. कोर्ट मधून बाहेर येताना आरीफ भाईला मी दिसलो .त्यांनी लगेच रुग्णवाहिका बोलावली आणि मला दवाखान्रात नेले. दवाखान्रात माझ्रावर उपचार चालूअसताना

अरे कर्तव्य प्यार क्या होता है? मै यह तो नही बता सकता | लेकीन यह जरुर कह सकता हू, “अगर तुम किसीसे प्यार करते तो मरनेके लिये साथ मत जियो , साथ जिने के लिये मरो” | और तू मर भी उस लडकी के लिये रहा है जो किसी और से प्यार करती है | तुझे जिना होगा | एक दिन तेरी जन्दगी में तुझसे प्यार करणे वाली व्यक्ती आयेगी | आज तुने मुझपर बडा एहसान किया है | तेरा दिल बहुत बडा है यार | तू मुझे एहसान चुकाने का एक अवसर दे | मेरे शादी के पेहले नही मानता था, इसलिये तुझे मारने के लिये वो लडके मैने ही भेजे थे | हा यार मुझे माफ कर दे | लेकीन मुझे यह वचन दे कि आत्महत्या करणे का विचार भी तेरे मन में नही आएगा | तुझे अपनी दोस्ती के खातीर जिना होगा | 

आरीफ भाईनी मला लपून घरी सोडले, आईला सर्व काही खरे सांगितले . आणि निघून गेले. माझी स्विझर्लंड ला जाण्याची वेळ जवळ आली. आणि मी सर्व गोष्टी विसरण्याचा निर्णय घेतला. मी आता साध्या मनानेसुखात स्विझर्लंड ला निघालो . दोन वर्ष माझेतेथेच शिक्षण झाले. मला भारतातच नोकरी मिळाली . मी स्विझर्लंडहून निघण्याआधी आईने मला विचारले की, “काय रे बाळा मुलगी बघितली का लग्नासाठी कि आम्हीच बघायची?” मी म्हणालो, “ नाही आई मी मुलगी नाही बघितली आणि स्वतःहून बघणारही नाही. तुम्हीच माझ्यासाठी मुलगी पहा. तुम्ही निवडलेल्या मुलीसोबतच मी लग्न करणार.”

आज मी स्विझरलँड हून परत आलो. नातेवाईकांमधून बरीच मंडळी मला भेटायला आली होती. माझी दीदी सुद्धा तिच्या मुलीला ‘नन्न्या’ ला घेऊन आली होती. मी सर्वांसाठी आणलेले गिफ्ट्स दिले. गप्पा गोष्टींमध्ये माझ्या लग्नाचे सुद्धा विचार निघालेत . दोन-तीन दिवसानंतर आईने एका रात्री मला विचारले कि लग्न करायचे का आता? बाबांचा विचार आहे की तुझेलग्न ह्या उन्हाळ्यातच करून टाकावे. मी म्हणालो, “काय हे लग्न लग्न? नको ना हे सर्व ..मी लहानच आहे. कारण मी तुझ्रा कुशीत शांत झोपलो नाही. मला तुझ्या कुशीत शांत झोपायचेआहे. मला तुझी बाबांची भरपूर सेवा करायची आहे. लग्नानंतर कु ठे मला ह्या गोष्टी करायला भेटतील? तुझी सून कशी असेल नी काय असेल? तिच्या हातून सेवा घडणेतर दुरच मलासुद्धा सेवा करू देणार की नाही कुणास ठाऊक.” आई लगेच बोलली, “ए गप रे, माझ्या सुनीबद्दल बोलण्याचे अधिकार तुला कुणी दिले रे? आणि मी पाहीलेली मुलगी नक्कीच तुला पाहिजे तशी वागेल. तुझी खूप काळजी घेइल.आणि तू खूश तर आम्ही खूश रे बाळा.” माझ्या डोळ्यात पाणी आले कारण मला माहिती होते माझे नशीब इतके चांगले नाही. आई पुढे बोलली, “अरे बाळा घरात लक्ष्मी येण्या करीता फक्त त्या मुलाचे नशीब चांगले असून चालत नाही. तर त्या घरातील आई-बाबांचे, प्रत्येकाचेच नशीब चांगलेअसणेगरजेचेअसते आणि तुला जर आमचे आमच्या नशिबावर विश्वास असेल तर तू माझं नक्की ऐकशील.” मी म्हणालो, “हो गं आई मला नक्कीच विश्वास आहे.” आई हसत हसत म्हणाली, “चल झोप आता, लग्नाचा विषय काढला तर झोपही उडाली त्याची.”
















आणि तसेही तु स्विझरलँड ला गेल्यापासून राधा रोजच मला मदत करायची. एके दिवशी मी तिला विचारलेच कर्तव्य बद्दल काय माहिती आहे? तिने मला तुझ्याबद्दल, अवनीबद्दल आणि आणखी एका मुलीबद्दल सांगितले जिचे नाव तिलाही माहिती नाही आणि आता मला माहितीही करून घ्यायचे नाही. मग राधाने तिचे तुझ्यावर प्रेम असल्याचे मला सांगितले. 


शेवट : सर्वांना पत्रिका वाटण्यात आल्या. मी आरीफ भाईला सुद्धा माझ्या लग्नाची पत्रिका पाठविली. पत्रिका घरी पोहचली. आरीफ भाई च्या पत्नीने पत्रिका हातात घेतली. पत्रिका वाचून ती पत्रिका तिच्या हृदयाला लावली. पत्रिका हृदयाला लावन्याचे एक कारण म्हणजे माझी सर्व परिस्थिती त्या व्यक्तीला माहिती होती आणि माझा लग्न करण्याचा निर्णय पाहून, माझे नवीन आयुष्य सुरु झाल्याचे पाहून आरीफ भाईची पत्नी खुश होती. माझे त्यांच्या वर अजूनही उपकार असल्याचे ती मानत होती. आणि पत्रिका हृदयाला लावन्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांचे लग्न मी स्वतः लाऊन दिले होते. त्यांनी मला दवाखान्यातून आपल्या सोबत घेन्यासाठी स्वतः म्हटले होते. माझ्या जखमा भरल्या होत्या. माझी काळजी घेतली होती.

0 comments:

Post a Comment